हजरत मौलवी साहब दर्गाहाचा १३२ वा उर्स उत्साहात संपन्न

वसमत (प्रतिनिधी) वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत बैहरुल-उलुम  मौलाना मौलवी शाह मोहम्मद गुलाम नकशबंद अलमारुफ मौलवी सहाब किबला रहे.मुसाफिरशहा मोहल्ला मस्जिद मौलवी साहबचा १३२ वा उर्स २० मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला आहे

हजरत खारी शाह मोहम्मद ताजोद्दीन उमर फारोखी अल खादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत मौलाना मौलवी शाह मोहम्मद रफीयोद्दीन कंधारी (रहे.) यांच्या मार्गदर्शनाखाली व हजरत शाह मोहम्मद अनिसोद्दीन फारोखी मुतवल्ली मस्जिद -ए- मौलवी साहब व दर्गाह हजरत मौलवी साहब यांच्या  नेतृत्वाखाली २० मार्च रोजी बाद नमाजे असर मुतवल्ली यांच्या निवासस्थानावरुन संद्दल मिरवणूक निघाली बाद नमाजे मगरीब संदल माली,फातेहा व हलका-ए-जिक्र संपन्न झाला तर बाद नमाजे ईशा महफिले मिलाद व लंगर ने कार्यक्रमाची सांगता झाली

उर्ससाठी विविध ठिकाणाहून भाविकांनी हजेरी लावली सामाजिक एकोप्यातून उत्साहात उर्स व विविध कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्गाहाचे मुतवल्ली व भाविकांनी पुढाकार घेतला

News Category: 
Basmat

Sharing