पूर्णासाठी ९ जुलै रोजी होणार मतदान,पूर्णा कारखाना व दोन्ही पॅनलने खंडपीठात दाखल केली होती याचिका

वसमत:(प्रतिनिधी)
‘पूर्णा’ ची निवडणूक सहकार विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याचे आदेश २८ जून रोजी धडकले होते. या आदेशाविरुद्ध पूर्णा सहकारी साखर कारखाना व दोन्ही पैंनलच्या उमेदवारांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.दरम्यान मा.खंडपीठाने "पूर्णा’ साठी ९ जुलै रोजी मतदान घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वसमत तालुक्यातील ‘पूर्णा’ सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा प्रचार जोमात असतानाच २८ जून रोजी सहकार विभागाने जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या महिन्यांत पाऊसाचा जोर असतो. यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतील.त्यामुळे ३० सप्टेंबर पर्यंत आहे त्या परिस्थितीत पूर्णा कारखान्यांसह राज्यातील इतर संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध पूर्णा सहकारी साखर कारखाना व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,आ. राजुभैय्या नवघरे
यांच्या पॅनलचे उमेदवार शहाजी देसाई (चुडावा),गजानन नामदेव धवन,
श्रीधर दगडू पारवे तर शेतकरी विकास परिवर्तन पैंनल कडून सौ.उज्वला तांभाळे, डॉ.धोंडीराम पार्डीकर आदींनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज ५ जूलै रोजी मा.खंडपीठात सुनावणी झाली.दरम्यान खंडपीठाचे मा.न्यायाधीश मंगेश पाटील व शैलेश ब्रम्हे यांनी सुनावणीची पडताळणी करत ९ जुलै रोजी पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान करुन घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत या मुळे थंड पडलेली निवडणूक प्रक्रिया व निवडणूक प्रचारास पुन्हा गती येणार आहे
पूर्णा कारखान्या कडून अँड. व्ही.डी.होणं व अँड.सि.ए.देशमुख यांनी बाजु मांडली