वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यावर विशेष पथकाची धाड,2 अटक 9 पसार,3 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त


वसमत (प्रतिनिधी) वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील फत्तेपूर शिवारात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री विशेष पथकाने धाड टाकली असून यात 11 दुचाकी,रोख रक्कम सह 3 लाख 56 हजार 610 रुपयाच्या मुद्देमाला सह दोन जणांना ताब्यात घेतले असून नऊ जण पसार झाले आहेत आहे
वसमत तालुक्यातील फत्तेपुर शेत शिवारात साईनाथ जाधव यांचे शेतातील आखाड्यावर मोकळ्या जागेत सरासपणे जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे फौजदार हौसाजी चिरमाडे यांच्या पथकाने
दि 27 मार्च रोजी 18.00 च्या सुमारास धाड टाकली असता यातील 11 आरोपी हे गोलाकार रिंगण करून पत्यावर पैसे लावुन जुगार खेळ खेळत असताना आढळुन आले यातील नवनाथ महादु पडोळे वय 32 वर्ष रा पळसगाव ता वसमत जि.हिंगोली व विश्वनाथ विठठलराव खराटे व्यवसाय शेती रा.कौठा ता. वसमत जि हिंगोली यांना पोलीसांना ताब्यात घेतले तर इतर अनोळखी 09 व्यक्ती पसार झाले आहेत दोघांना समजपत्रावर सोडण्यात आले
सदर जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी
11 दुचाकी,रोख रक्कम सह 3 लाख 56 हजार 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे
या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काचमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे करीत आहेत