वसमत विधानसभा मतदारसंघात आमदार नवघरेंचा विकास कामांचा धडाका, हट्टा येथे 56 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

वसमत (प्रतिनिधी)
वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून व निधीतून मतदार संघात विविध विकास कामाचाधडाका सुरू असून हट्टा येथे 56 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले

मान्यवरांच्या व नागरिकांना उपस्थितीत तसेच आ.राजुभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या विकास कामात जुनी कन्या शाळा ते रंगनाथ जाधव यांच्या घरापर्यंत सी.सी रोड करणे. तसेच खंडोबा मंदिर सार्वजनिक विहीर,पेव्हर ब्लॉक करणे तसेच स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे व सुशोभिकरण करणे तसेच वैदु समाज सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे तसेच बाळूमामा संस्थान परिसरात सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे.

या विविध विकास कामांमुळे या परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध होतील,विकसित रस्त्यांच्या माध्यमातून दळणवळण सुधारेल व अधिक सोयीसुविधा वाढतील. अशा अनेक बाबी चा फायदा ग्रामस्थांना होणार असल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण असून आमदार महोदयांचे आभार व्यक्त होत आहेत

News Category: 
vidhansabha

Sharing