मर्यादेपेक्षा अधिक आवाज करून ध्वनीक्षेपक (डी.जे.) चा वापर केल्याप्रकरणी जिल्हयात ०२ गुन्हे दाखल,हिंगोली व वसमत येथील (डी.जे.)चालकांवर कार्यवाही,डी.जे.पुरवणाऱ्या विरुद्ध होणार कारवाई - चंद्रशेखर कदम


हिंगोली (प्रतिनिधी)
ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० अन्वये तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचे सुचनेनुसार ध्वनीक्षेपक वापराबाबत निश्चीत डेसीबलची (आवाज) मर्यादा ठरवुन दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक- ३० मार्च रोजी जिल्हयात झालेल्या कार्यक्रम मिरवणुकीमध्ये पोलीसांचे परवानगी व सुचनांचे पालन करता हिंगोली शहर व वसमत शहर येथे ध्वनीक्षेपक डी.जे अधिक व कर्णकर्कश आवाजात वाजवुन पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन हिंगोली शहर व वसमत शहर येथे ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार फिर्यादी पोलीस अंमलदार नामे - ग्यानदेव सखाराम घुगे यांचे तकारी वरून नामे- १) महेश चक्रावार रा. गाडीपुरा हिंगोली २) केशव उर्फ सोनु शिवाजी जाधव रा. अकोला बायपास व डी. जे. चे साहीत्य असलेले वाहनाचा चालक यांचे विरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुरनं. २६४/२०२३ कलम २६८, १८८, ३४ भादवी सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच कलम ६८१४०, ३३ (२), (३) - १३१ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच पोलीस स्टेशन वसमत शहर येथे फिर्यादी पोलीस अंमलदार नामे - विवेक बलभिम गुंडरे यांचे तक्रारी वरून १) भागवत शेषराव सावंत रा. भोरपगाव ता. वसमत जि. हिंगोली २) पिंटु पप्पलवाड ३) गजानन भोकरे ४) किशोर टाकणकर यांचे विरूध्द गुरनं. १८७ / २०२३ कलम २६८,१८८, ३४ भादवी सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच कलम ६८१४०, ३३(२), (३)-१३१ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन संबधीत पोलीस स्टेशन गुन्हयांचा अधिक तपास करीत आहेत.
तरी सर्व नागरीकांना आवाहन आहे कि, यापुढेही कोणतेही सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, लग्न समारंभ व ईतर प्रसंगी मर्यादेच्या पलीकडे आवाज असणारे ध्वनीक्षेपक (डी. जे.) चा कोणीही वापर करू नये जिल्हा पोलीस दलाकडुन वेळोवेळी त्याबाबत तपासणी करण्यात येणार असुन मर्यादीत आवाजापेक्षा अधिक आवाज असणारे ध्वनीक्षेपक डी.जे. वर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यात असे डी. जे. लावुन कार्यक्रम घेणारे आयोजक तसचे डी. जे. चा मालक यांचे विरूध्द गुन्हे दाखल करण्यात येणार असुन असे मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणारे डी. जे. चे सर्व साहीत्यही जप्त केल्या जाणार आहे
मा.पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी.जे विरुद्ध अत्यंत कडक भूमिका घेण्यात आली आहे त्यातूनच सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी सण उत्सव काळात डी.जे धारकांनी वसमत येथे कोणालाही डी.जे पुरवू नये तसे केल्यास संबंधिता विरुद्ध कठोर कारवाही करण्यात येऊन डी.जे व साहित्य जप्त करण्यात येईल
चंद्रशेखर कदम
(पोलीस निरीक्षक)
वसमत शहर