शांतीदूत परिवारचा ६ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न,रक्तदान शिबीर, अवयवदान,ध्यान शिबीर,मान्यवरांना शांतीदूत रत्न पुरस्काराचे वितरण

पुणे (प्रतिनिधी)सामाजिक क्षेत्रांत कार्यकरणाऱ्या शांतीदूत परिवाराचा ६ वा वर्धापनदिन रक्तदान शिबीर, अवयवदान,ध्यान शिबीर, मान्यवरांना शांतीदूत रत्न पुरस्कार आशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एलओसी हॉस्पिटल नीलायम सिनेमागृह चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सल्लागार विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य विठ्ठल जाधव, शांतीदूत परिवार संस्थापक विद्याताई जाधव, महाराष्ट्र अध्यक्ष तृशाली जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रामदासजी माने, जीएसटी अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंके, संत तुकाराम महाराज यांचे थेट वंशज ह . भ. प.प्रशांतमहाराज मोरे, प्रवीण पाटील IPS अप्पर पोलिस आयुक्त,निखील पिंगळे IPS पोलिस उपायुक्त, प्रचार्य डॉ.रामदास चावरे, गझल नवाज श्री भीमराव पांचाळे,ब्रम्हकुमारी आशा दिदी, प्रा.गुणवंत राव जाधवर आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना रामदास माने यांनी तरुणांनी उद्योगाची कास धरून स्वतःची व देशाची प्रगती करावी असे प्रतिपादन केले. विठ्ठल जाधव यांनी बोलताना व्यक्तींनी स्वतः पुरते आर्थिक व सामाजिक काम करण्या ऐवजी सर्वांना प्रेमाने सोबत घेवून कार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी LOC HOSPITAL चे डॉ शशांक शहा, डॉ पूनम शहा व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय बोत्रे यांनी केले. आभार प्रदर्शन तृषाली जाधव यांनी केले. कार्यक्रमानंतर राज्य स्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात आरोग्य, शिक्षण व कृषी क्षेत्रात करावयाच्या सामाजिक सेवा कार्याबद्दल,श्री विजय भोसले, कृषिभूषण एकनाथराव कराळे व डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक से. नि. यांनी मार्गदर्शन केले
छायाचित्र : पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र