विशेष कोंबिंग ऑपरेशन दरम्यान वसमत शहर पोलिसची धडक कारवाई,दोन जण ताब्यात एक तलवार आणि एक खंजर जप्त,घातक शस्त्र ठेवणाऱ्याची माहिती द्या - चंद्रशेखर कदम

वसमत (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष कोंबिंग ऑपरेशन दरम्यान वसमत शहर पोलिसांनी धडक कारवाई.करत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळुन एक तलवार आणि एक खंजर जप्त केला आहे

    शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहून आगामी सण उत्सव शांततेत संपन्न व्हावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन सुरू केले असून या कारवाई दरम्यान ३१ मार्च रोजी तुफानसिंग शेरसिंग चव्हाण व सुरजितसिंग शेरसिंग चव्हाण दोघे रा.रेल्वे स्टेशन रोड वसमत याच्या जवळुन एक तलवार व एक खंजर जप्त केले आहे
 
   वसमतचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात,फौजदार राहुल महीपाळे,ए.एस.आय वाघमारे,पिंटू राठोड,संदीप चव्हाण,विवेक गुंडरे, भगीरथ सवंडकर,महिला कर्मचारी कविता तुरूंकमाने,आम्रपाली कांबळे,आदींच्या पथकाने ही कारवाही केली प्रकरणाचा पुढील तपास जी.बी भोपे करीत आहेत समजपत्र देऊन दोघांना सोडण्यात आले आहे

घातक शस्त्र ठेवणाऱ्याची माहिती द्या - चंद्रशेखर कदम 

वसमत शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरू असून आपल्या परिसरात कोणाजवळ गावठी बंदूका,घातक शस्त्र-असत्रे, असल्यास त्याची माहिती 7083552233 या नंबर वर द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून शहराची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक वसमत शहर चंद्रशेखर कदम यांनी केले आहे

News Category: 
Basmat

Sharing