शिवेश्वर नागरी सहकारी बँकेत माजी मंत्री  जयप्रकाश दांडेगावकरांचा सत्कार

वसमत (प्रतिनिधी)
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची कोजन असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनिवड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी नुकताच जीवन साधना गौरव पुरस्कार त्यांना जाहीर केल्या बद्दल रविवारी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेत अध्यक्ष व संचालक मंडळांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी बैंकेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवदासजी बोडेवार हे उपस्थित होते या वेळी माजी मंत्री तथा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांचा बँकेच्या वतीने शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला 

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय दलाल,संचालक बालासाहेब जाधव,विनोद झंवर,नागनाथराव कोंपलवर ,लक्ष्मीकांत कोसलगे,वसंत चेपुरवार, मैनोद्दिन संदलजी,भारत नामपल्ली,नारायण लासीनकर,बालाजी माळवटकर,डॉक्टर धोंडीराम पर्डिकर, राधाकिशन साबणे पाटील,सौ.शकुंतलाबाई देवणे,सौ रुपाली दगडू, एडवोकेट दीपक कट्टेकर, रमाकांत भागानगरे, C.A सोनी,सचिन कापूसकरी ,आदींची उपस्थिती होती

News Category: 
Basmat

Sharing