ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जयप्रकाश दांडेगावकर,आमदार राजूभैय्या नवघरे यांचे सरकारवर ताशेरे



हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,सरसकट कर्ज माफी करावी यांसह इतर मागण्यांसाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला.
या वेळी सहभागी शेतकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत सरकार च्या धोरणा विरोधात घोषणाबाजी केली सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शहरातील प्रमुख मार्गावरून निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या वेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त जिल्ह्याला जे निकष लागू होतात ते निकष लागू झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी व उद्योगासाठी कर्ज घेत असताना सिबिल स्कोरची अट लावू नये, पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, दरवर्षी वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असून या संदर्भात योग्य ती उपाय योजना करावी. जिल्हा परिषद भरतीवरील स्थगिती उठवावी,पोलिस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे देण्यात आले.
मोर्चात राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे,काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ प्रज्ञाताई सातव,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनीष आखरे,डी.एन.अडकिणे, बी.डी.बांगर,तालुकाध्यक्ष माधव कोरडे,त्र्येम्बक कदम,शहर अध्यक्ष शेख अय्युब पॉपुलर संजय दराडे,शिवाजी शिंदे, यांच्यासह हिंगोली जिल्हा भरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते सह हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
या वेळी जयप्रकाश दांडेगावकर,आमदार राजूभैय्या यांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांची बाजू मांडत सरकारच्या अलबेल कारभाराविरुद्ध चांगलेच ताशेरे ओढले