काँग्रेसच्या दावत-ए- इफ्तार मध्ये संविधान उद्देशिकेला प्राधान्य,हिंदू,मुस्लिम,बौद्ध,सिख ईसाई हम सब भाई-भाई चा देण्यात आला संदेश,सर्वधर्मीय,सर्वपक्षीय विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती



फेरोज पठाण (संपादक) काँग्रेसचे नेते अब्दुल हफिज यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या दावत-ए- इफ्तार मध्ये संविधान उद्देशिकेला प्राधान्य देत देशभरात संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीची अत्यंत गरज असल्या बाबतचा मार्मिक संदेश बैंनरच्या माध्यमातून जनजागृती करून देण्यात आला आहे
पवित्र रमजान महिना सुरू असून या निमित्त १९ एप्रिल रोजी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ. हफीज़ अ. रहेमान, यांच्या मार्गदशन व पुढाकारातून वसमत शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने नागरिकांसाठी शहरातील दर्गाह हजरत खान-ए-आलम येथे सार्वजनिक दावत -ए-ईफ्तारचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाला काँग्रेस नेते एम.आर.क्यातमवर,भाजपा नेते शिवदास बोड्डेवार, बी आर.एस.पक्षाचे प्रल्हाद राखोडे,वसमत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू माजी उपाध्यक्ष रियाजोद्दीन कुरेशी,मा. नगरसेवक खैसर अहेमद, रविकिरण वाघमारे,सचिन दगडू,दिलीप भोसले,खालेद शाकेर,शिवाजी अलडीगे, ऎड शेख मोसीन,नदीम सौदागर,डॉ.सनाउल्ला खान, विजय कडतन,नसीर कुरेशी, प्रा.गणेश कमळू, बी.डी. कदम,बाळासाहेब महागावकर, लक्ष्मीकांत नवघरे,शेख अय्युब,रफी अहेमद मोदी,शाम कदम, राजकुमार पटाईत, वसंत चेपूरवार,शिवाजी चेपूरवार, संजय साबने,गजानन पाठक,शंकरराव क-हाळे, राजू बेले,राकमुमार एंगडे, गौतम मोगले,अविनाश गायकवाड,अमन पठाण, सह विविध पक्षाचे पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते,व्यापारी,पत्रकार,डॉक्टर,शिक्षक आदी उपस्थित होती
या वेळी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील बॅनरवर पक्षाचे चिन्ह किंवा राजकीय मंडळींच्या फोटो ऐवजी भारताचे संविधान उद्देशिका प्रकाशित करण्यात आली आज घडीला देशात निर्माण होत असलेल्या दूषित वातावरणावर आळा घालण्यासाठी संविधानच एक मात्र पर्याय असून संविधानानुसार सामाजिक एकोप्यातून देश चालवले जाण्याची अत्यंत गरज आहे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिस,इसाई हम सब भाई-भाई असा मार्मिक संदेश या माध्यमातून देण्यात आला
या विषयाची शहरात चर्चा होताना दिसत आहेत काँग्रेसच नेते अब्दुल हफिज, एम.आर. क्यातमवर,तालुकाध्यक्ष राजाराम खराटे, शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन व अ. हफिज कुटुंबियांकडून उपस्थितांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले