पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 150 वर्षे पूर्वी स्थापन केलेल्या सहकार क्षेत्राला बळकटी देने काळाची गरज, खा.राहुल गांधी व जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शिष्टमंडळात तब्बल 37 मिनटं चर्चा

फेरोज पठाण (संपादक)
भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सहकार क्षेत्र,साखर कारखानदारी संदर्भात बुधवारी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळास वेळ देऊन तब्बल 37 मिनटं चर्चा केली यावेळी देशाच्या प्रगतीसाठी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या सहकार क्षेत्राला बळकटी देणे काळाची गरज असल्या बाबतची भूमिका शिष्टमंडळाने मांडली तसेच राहुल गांधी यांनी सहकार क्षेत्रातील अडी अडचणी बाबत जाणून घेतल्या

मा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चालू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आली असून नांदेड भागात आहे. मा.राहुल गांधी हे नांदेड परिसरात असतांना मा.मंत्री तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर मा.आमदार राजुभैया नवघरे व मा.दिलीप चव्हाण, मा.अंबादास मामा भोसले यांनी मा.राहुल गांधी यांची भेट घेऊन विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व सविस्तर चर्चा केली.

एकूण 37 मिनिटे ही चर्चा चालली असून या चर्चेमध्ये अनेक विषयासंदर्भात 
मा.दांडेगावकर व शिष्टमंडळाने मा.राहुल गांधी यांना सखोल अशी माहिती दिली.

या चर्चेमध्ये साखर, सहकार क्षेत्र हा महत्त्वाचा विषय होता.या क्षेत्रामधील बरेच प्रमुख विषय या बैठकीमध्ये चर्चिले गेले.साखर सहकार क्षेत्र हे आपल्या देशामध्ये 150 वर्षे एवढे जुने क्षेत्र आहे. 1952 मध्ये मा.पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या क्षेत्राची अधिकृतरित्या स्थापना केली व तेव्हापासून या क्षेत्राने अनेक टप्पे चढत यश मिळवले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत या क्षेत्राला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या केंद्रात सत्तेत असलेली सरकार या साखर सहकार क्षेत्रा संबंधि अत्यंत अधोरणी तसेच प्रतिकूल अशी आहे. 
पूर्वी NDA मध्ये जाचक अटी व tax नव्हते. त्यामुळे अनेक सवलती होत्या, त्या आता नाहीत. तसेच FRP, MSP Policy अशा विविध विषयांसंदर्भात योग्य ते धोरण स्वीकारले पाहिजे. असा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चिण्यात आला. तसेच सध्याची केंद्र सरकार दरवर्षी साखर सहकार क्षेत्रावर नवनवीन नियम लादत आहे, त्यामुळे या क्षेत्रात अनेक अडचणी येत आहेत. तसेच निर्यात धोरणात ही मोठ्या प्रमाणावर बदल केल्या गेला असल्याने त्यातही अनेक अडचणी उत्पन्न झाल्या आहेत. साखर सहकार क्षेत्रात शेतकरी संख्येनुसार काही महत्त्वपूर्ण धोरणे अमलात आणण्याची व स्वीकारण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
वरील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मा.राहुल गांधी यांच्यासह अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल अशी चर्चा मा.जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आमदार राजुभैया नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून मा.राहुल गांधींना अनेक मुद्दे निदर्शनास आणून दिले. 

साखर सहकार क्षेत्र हे या देशाच्या अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. या क्षेत्राचा थेट कृषी क्षेत्राशी संबंध असल्याने देशाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून या क्षेत्राला पाहिले पाहिजे आणि या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व धोरणे स्वीकारावी लागतील आणि येत्या काळात अशी धोरणे स्वीकारली जातील अशी आशा आहे.

या बैठकीतील चर्चाही अत्यंत महत्त्वाची असून या बैठकीतील बुलेट पॉईंट्स आपल्याला वैयक्तिक मिळावेत यासाठी मा.राहुल गांधी यांना या बैठकीतील सर्व बुलेट पॉईंट्स ची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

राज्याची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती

News Category: 
Maharashtra

Sharing