गर्भवती महिलेस,मारहाण, विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी,तीन जनाविरुद्ध वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल

वसमत (प्रतिनिधी)
बसमधिल सिटवर बसन्याचे कारणावरुन गर्भवती महिला व तिच्या पतिस शिविगाळ करुन लाथाबुक्कयांनी मारहान करीत महिलेचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा तीन जनाविरुद्ध वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी शाहिस्ता भ्र शेख आसेफ वय २० वर्षे रा. दर्गारोड, रहिमनगर परभणी ह्या रमजान ईद भेटण्यासाठी आपल्या पतीसह वसमतला माहेरी आल्या होत्या २४ एप्रिल रोजी सकाळी त्या व त्यांचे पती शेख आसेफ दोघे वसमत बसस्थानक येथे आले व वसमत ते परभणी दरम्यान बसने प्रवासात जात असताना
फिर्यादी व तिचे पती यांना बसमधिल सिटवर बसन्याचे कारणावरुन बसमधील अंदाजे २० ते २५ वर्ष वयाच्या तिन अनोळखी पुरुषांनी शिविगाळ करुन भांडणाची खुरापत काढुन फिर्यादिस व फिर्यादिचे पतिस लाथाबुक्कयांनी मारहान करुन फिर्यादिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा कलम ३५४,२९४, ३२३,५०४, ५०६,३४ भा.द.वी.प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे पीडित महिला गर्भवती आहे
पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तिघांना तात्काळ ताब्यात घेऊन न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली प्रकरणाचा पुढील तपास पो.नि चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सदानंद मेंडके करीत आहे