जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम

वसमत (प्रतिनिधी) शुक्रवार दि.5 मे रोजी रसायनी परिसरातील जेष्ठ समाजसेवक वसमत चे भुमीपुत्र प्रकाशशेठ गायकवाड यांना 60 वर्षे पूर्ण होत असून वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9:00 वाजता बुध्दपुजा व वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम रिस येथे,सकाळी 10 वाजता -मोहोपाडा पोलिस चौकीजवळ पाणपोई उदघाटन,सकाळी 10:30 वाजता जनता विद्यालय मराठी माध्यमाला येथे शालेय फर्निचर वाटप,
सकाळी 11 वाजता परिसरात हाॅस्पिटलात रुग्णांना फळ वाटप,सकाळी 11:30 वाजता कांबे येथील मंदिरात फॅन भेट,सायं 7 वाजता रिस येथील निवासस्थानी शुभेच्छा समारंभ व स्नेहभोजनाचे आयोजीन करण्यात आले आहे

सर्व कार्यंक्रमांना स्नेही,मित्रमंडळींना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे युवा नेतृत्व प्रशांत गायकवाड यांनी केले आहे

News Category: 
Basmat

Sharing