भारत राष्ट्र समिती वसमत विधानसभेची शनिवारी बैठक

 वसमत (प्रतिनिधि) भारत राष्ट्र समिती (बी.आर.एस) पक्षाची बैठक शनिवार दिनांक ०६ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय,परभणी रोड, वसमत येथे आयोजित करण्यात आली आहे.

पक्षाचे वसमत विधानसभेचे नेते प्रल्हादभाऊ राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न होणा-या बैठकीत आगामी निवडणुका संदर्भात बीआरएस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह वसमत विधानसभेतील इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

 या बैठकीला वसमत विधान सभा क्षेत्रातील  बीआरएस पक्ष प्रेमी, शेतकरी,कष्टकरी,युवक, युवती,व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन गोरख पाटील,एम.डी. अंभोरे यांनी प्रसिद्ध माध्यमातून केले आहे

Sharing