पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या कारणानें सासूचा खून,वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात घडला थरर..काप

वसमत (प्रतिनिधी)
पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या कारणावरुन जावयाने सासूचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची थरर..काप उडणारी घटना ८ मे च्या पहाटे ५ 
वाजण्या च्या सुमारास शहरातील झेंडा चौक परिसरात घडली पोलिसांनी तत्परता दाखवत खुनी जावयाला अटक केली आहे

पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की ८ मे च्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील झेंडा चौक परिसरात खांडेगावकर यांच्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या शेवंताबाई होणाजी वंजे वय ७५ वर्ष यांचे आणि जावई बाबासाहेब शिंनगारे राहणार श्रीरामपूर यांनी सासू सोबत भांडण सुरु केले तु माझ्या पत्नीला कोठे पळवुन लावलेस माझ्या सोबत नांदावयास का पाठवित नाही या गोष्टीचा राग मनात धरुन सासुचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून लाथाने तोंडावर, छातीवर मारहाण करुन तिला जिवे ठार मारुन तिचा खून केला व पत्नीस जिवे मारण्याची धमकी दिली

घटनेची माहिती मिळताच तत्परतेने प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा  शहर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,जमादार गजानन भोपे,प्रशांत मुंडे, कृष्णा चव्हाण, भगीरथ सवंडकर यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे  सदरील जावयास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास सपोनि भिंगारे करीत आहेत

News Category: 
Basmat

Sharing