खूनाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता,वसमत जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल

वसमत (प्रतिनिधी)
खुनाच्या खटल्यातून आरोपी मारोती पोटे यांची वसमत येथील पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.यु.सी.देशमुख यांनी 10 मे रोजी निर्दोष मुक्तता केली. 

मौजे सिरळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील फिर्यादीने पोलीस स्टेशन कुरुंदा येथे दिनांक 30/06/2016 रोजी फिर्याद दिली होती की दिनांक 29/06/2016 रोजी दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या वडीलास तुझ्या मुलाने माझ्या मुलाचा मोबाईल नेला आहे ते तू मला देतू का देत नाही. म्हनुन धारदार शस्त्राने मारून खून केला.अशी तक्रार दिली.सदरच्या घटनेनंतर फिर्यादी तुकाराम बळीराम पोटे यांनी पोलिस स्टेशन कुरुंदा येथे फिर्याद दिल्यावरून आरोपी विरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले त्यांच्या साक्ष पुराव्यातील विसंगतीचा विचार करून मा.न्यायालयाने आरोपीची खूनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे

सदरच्या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.प्रदीप भी. देशमुख यांनी बाजू मांडली  व त्यांना ॲड.परमेश्वर शिंदे, ॲड.बालाजी चलकलवाड, ॲड. दामिनी डहाळे, यांनी सहकार्य केले.

News Category: 
Basmat

Sharing