मोटार सायकल चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी गजाआड, स्था.गु.शा.हिंगोलीची कार्यवाही १७ दुचाकी सह १० लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली (प्रतिनिधी)
मोटार सायकल चोरी करणारी अंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून पथकातील वेगवेगळ्या कार्यवाहीत चो-यातील १७ दुचाकी सह एकूण १० लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त मुद्देमाल जप्त
हिंगोली जिल्हयात होणारे मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणे संदर्भाने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि.श्री पंडीत कच्छवे यांना सुचना देवून स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमले होते.
त्याअनुषंषाने
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास माहीती मिळाली की, दि. २९.०५.२०२३ रोजी पोस्टे नर्सी ना येथे मोटर सायकल चोरीच्या गुन्हयासंदर्भाने संशयीत आरोपी नामे १) योगेश तान्हाजी शिंदे वय २० वर्ष, रा. सिध्देश्वर २) दशरथ लालसिंग पवार वय २६ वर्ष रा. पेडगाव हे असून त्यांनी हिंगोली जिल्हयासह बाहेर जिल्यातील मोटर सायकल चोरी केल्या आहेत.
अशी गोपनिय बातमी मिळाल्या संदर्भाने दोन्ही संशयीत आरोपीस ताब्यात घेवून विचारपुस केली असता सदर आरोपीतांनी मोटर सायकल चोरी केल्याची कबूली देवून त्यांचे ताब्यातून एकून ०९ मोटर सायकल किमंती ६,००,००० रू (सहा लाख रू) चा मुददेमाल जप्त करून अधिक विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे नर्सी नामदेव, पोस्टे वसमत ग्रामीण, छ. संभाजीनगर हददीतील सातारा पोस्टे परीसरातून मोटर सायकल चोरी केल्याची कबूली दिली असून एकून ०५ गुन्हे उघड झाले आहेत.
तसेच मौजे पार्डी मोड ता. कळमूनरी येथील इसम नामे गजानन कामाजी पवार रा. पार्डी मोड ता. कळमनुरी येथील इसम हा चोरीच्या मोटर सायकल बाळगत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यावरून नमूद आरोपीस ताब्यात घेवून त्यास मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हे केल्याची कबूली दिली सदर आरोपीचे ताब्यातून एकून ०८ मोटर सायकल किंमती ०४ लाख ७० हजार रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.नमूद तिन्ही आरोपीकडून एकून १७ मोटर सायकल किंमती १० लाख ७० हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीतांकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री. पंडीत कच्छवे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा. चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. एस.एस. घेवारे, पोलीस उप निरीक्षक श्री व्ही. पी. विठुबोने, पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, भगवान आडे, गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, गणेश लकूळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे, चापोकॉ / प्रशांत वाघमारे, यांनी केली आहे.