नांदेड-आसेगाव रोडवर दरोडयाच्या डावात बसलेल्या टोळीवर पोलिसांचा डाव,पिस्टल,कत्ता,सुरा,मिर्चीपुड दरोड्याचा साहित्य जप्त,तीनजण अटक दोन पसार

वसमत (प्रतिनिधी)
वसमत शहरालगत नांदेड-आसेगाव रोडवर दरोडा टाकण्याच्या डावात असलेल्या टोळीवर शहर पोलिस पथकानी डाव टाकत तिघांना ताब्यात घेतले असून दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात पोलिस अधिक्षक जी . श्रीधर,अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांतर्गत गस्त सुरु असून गस्तीपथकांना फिक्स पाँईंटवर जाऊन हजेरी द्यावी लागत आहे .त्यामुळे गस्तीपथकेही सतर्क झाली आहेत दरम्यान वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल महिपाळे ,सुरेश भोसले , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हकीम , जमादार भगीरथ सवंडकर यांचे पथक गुरुवारी रात्री गस्तीवर होते
दरम्यान नांदेड-आसेगाव रोडवर एका रिकाम्या प्लॉटच्या बाजूला काही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने झुडूपात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पथकाने गुरुवारी मध्यरात्री सदर ठिकाणी छापा टाकला या मध्ये पाच जण झुडूपात लपुन बसल्याचे दिसून आले पोलिसांनी त्या पैकी तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरीत दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले
पोलिसांनी त्यांच्या कडून एक छर्यांची पिस्टल,एक सुरा ,एक सब्बल,मिरची पूड,दोरी आदी दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे .
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महिपाळे यांच्या तक्रारीवरून अक्षय पिराजी पवार,बाबा नागोराव गोरे,बालाजी उर्फ सिन्ना नागोराव गोरे,शिवा यलप्पा गुंडाळे ( सर्व रा . कारखाना रोड वसमत ) , शेख अहेमद शेख नसीर ( मुशाफीर मोहल्ला वसमत)यांच्या विरुध्द शुक्रवारी सकाळी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे .या तील फरार शिवा गुंडाळे व शेख अहेमद या दोघांचा पोलीसानी शोध सुरु केला आहे
मालेगाव,आसेगाव मार्गे नांदेड जाणाऱ्या रोडवर मागील काळात झालेल्या दरोड्याच्या घटनामध्ये या टोळीचा समावेश होता का या बाबत तपास सुरू असल्याची माहिती पो.नि चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे