उपजिल्हा रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा ,फेरोज शफीउल्लाखा पठाण व निलेश नेरलकर यांची सदस्यपदी नियुक्ती

वसमत (प्रतिनिधी) शासकीय उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे  शुक्रवारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.गंगाधर काळे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न झाली  बैठकीत विविध विषयांवर चर्चा होवुन सदस्य म्हणुन फेरोज शफीउल्लाखा पठाण व निलेश नेरलकर यांची नियुक्ती करण्यात आली

शुक्रवारी सन २०२३-२४ रुग्ण कल्याण समितीची पहिली बैठक संपन्न झाली या वेळी मार्गदर्शन करताना काळे म्हणाले की आ.राजुभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नातुन वसमतला पी.पी.पी तत्वावर डायलेसिस मंजूर झाली असून लवकरच उपजिल्हा रुग्णालयात सेवा कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले तसेच रुग्णालयात येणाऱ्यासाठी स्वच्छतागृह बांधणे व परिसरात सौर ऊर्जा पथदिवे बसविण्या बाबत समिती कडुन नगरपरिषदेस सूचित करण्यात आले 

यावेळी आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या सुचने प्रमाणे फेरोज शफीउल्लाखा पठाण व निलेश नेरलकर यांची रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात येवून दोघांना नियुक्ती पत्र देवुन सत्कार करण्यात आला

या वेळी विविध विभागाचे प्रतिनिधी,सदस्य उपस्थित होते जोगदंड यांनी  मागील वर्षांचा आढावा समिती समोर सादर केला

छाया-नागेश चवाहन

Sharing