"त्या" आयाबाई कडुन चुकीच्या पद्धतीने घरी बाळंतपणचा प्रयत्न,वसमत येथील आई व बाळाने गमावले जीव 

वसमत प्रतिनिधी 
एका गर्भवती महिलेची  प्रसुती (नॉर्मल डिलेव्हरी) करण्याच्या भानगडीत  बिना डिग्रीच्या "त्या" आयाबाई कडुन चुकीच्या पद्धतीने घरी बाळंतपणाचा प्रयत्न केल्याची किंमत वसमत येथील आई व बाळाला आपले जिव गमावुन मोजावी लागल्याची खळबळ जनक घटना वसमत शहरात घडल्याची   जोरदार चर्चा आहे

शहरात चर्चेला जात असलेल्या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी की ७ जुलै रोजी कारखाना रोडवर राहणाऱ्या एका गर्भवती महिलेचे  बाळंतपण करण्यासाठी एका घरी बाळंतपण करणारी महिला (आयाबाई) ला घरी बोलवण्यात आले दरम्यान कोणतीही शासकीय डिग्री किंवा प्रशिक्षण नसलेल्या "त्या" आयाबाई महिलेने प्रसुती (नॉर्मल डिलेव्हरी) करण्याचा विश्वास कुटुंबिया देवून अनेक प्रयत्न सदर गर्भवती महिलेवर केले परंतु  प्रसूती झाली नाही उलट गर्भवती महिलेस रक्तस्राव होऊन प्रकृति खालावली शेवटी कुटुंबीयांनी त्या महिलेस प्रसूतीसाठी वसमतच्या महिला रुग्णालयात नेले कर्तव्यावर असलेल्या डॉकटरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन रुग्णाला तात्काळ नांदेडला नेण्याचे सांगितले १०८ रुग्णवाहिकेतून नांदेडच्या विष्णुपरी येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले तेथे डॉकटरांनी सिजरीन केली  मात्र तो पर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता दम्यान उपचारा दरम्यान काल आईचे ही मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडल्याने नातेवाईकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे

विशेष म्हणजे कोणतीही डिग्री,अधिकृत परवानगी नसतानाही वसमत शहरात राहणा-या सदर आयाबाई पाहिले कडून घरी जाऊन गर्भवती महिलांची प्रसुती केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे काही महिन्यापूर्वी एका महिलेची प्रसुतीसाठी  प्रसुती ची जागा ब्लेड ने कापुन त्या ठिकाणी कपडे शिवायच्या सुई-दोऱ्याने टाके मारल्याची संताप जनक घटना घडली होती रुग्णाना सुई दोऱ्याने टाके मारणारी हीच ? तर ती आयाबाई नसेल ना ? असा संशय ही उपस्थित होत आहे गर्भवती महिलांच्या जीवितवाशी खेळणाऱ्या सदर आयाबाईची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे

तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करू -चंद्रशेखर कदम

अशा घटना अतिशय गंभीर व निंदनीय असून शहरात असे प्रकरण घडल्यास/ निदर्शनास आल्यास रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट शहर पोलीस स्थानकात तक्रार दिल्यास संबंधिता विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिला आहे

खाजगी व्यक्तीकडून घरी उपचार घेतल्यास जीवितवास धोका - डॉ.गंगाधर काळे

महिला रुग्णांनी प्रसूती व कोणतेही आजार असल्यास  शासकीय महिला व उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत सुविधेचा लाभ घ्यावा कोणत्याही अ- प्रशिक्षित खाजगी व्यक्तीकडून घरी बाळंतपण किंवा उपचार घेऊ नये जेणेकरून रुग्ण,आई व होणाऱ्या बाळाच्या जीवितवास धोका निर्माण होणार नाही असे आवाहन वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गंगाधर काळे यांनी केले आहे

"त्या" मेडिकलांची ही चौकशी व्हावी 

डॉक्टरांची प्रेस्क्रीप्शन असल्याशिवाय कोणतीही औषधी देता येत नसली तरी अशा आयाबाईं जवळ प्रसूती,शस्त्रक्रियेच्या वेळेस भुल देण्यासाठी लागणारे इंजेक्शन,औषधी येतात कोठून ? त्यांना कसे उपलब्ध होतात ? कोणते मेडिकल चालक यांना औषधी पुरवठा करतात याचाही तपास होणे गरजेचे आहे

News Category: 
Maharashtra

Sharing