वसमत पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ११ कोटी ३६ लाखाचा निधी मंजुर,आ. राजुभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नांना यश

फेरोज पठाण (संपादक) वसमत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास शासनाने मान्यता दिली असुन या साठी ११ कोटी ३६ लाख ८७ हजाराचा निधी मंजुर केल्याचे आदेश ९ ऑगस्ट रोजी निघाले असल्याची माहिती आ.आ. राजुभैय्या नवघरे यांनी दिली आहे

वसमत पंचायत समिती नविन प्रशासकिय इमारत बांधकाम करणे साठी दि. २६/०३/२०१८ रोजी २७१.८२ लक्ष रक्मेस प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आली होती.परंतु त्यावेळी सदरील कामाच्या जागे बाबत निर्णय झालेला नसल्याने सदर कामाची निवीदा रद्द करुन फेर निविदा करण्याचा निर्णय ई-निवीदा समितीत सर्वानुमते झाला होता
 
वसमत तालुक्यातील शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी २ नोव्हेंबर २०२२ व
८ फेब्रुवारी २०२३ रोजी
वसमत पंचायत समिती  नविन प्रशासकिय इमारत बांधकामास विशेष बाब म्हणुन प्रशासकिय मान्यता प्रदान करणे व निधी मंजुर करणे बाबतची लेखी मागणी शासनाकडे करत सदर कामासाठी जागा उलब्ध झालेली असुन वसमत तालुका हा हिंगोली जिल्हयातील सर्वात मोठा तालुका व पंचायत समिती असल्याने येथे सदर पंचायत समितीचा नव्याने व नविन दरसुचीनुसार सुधारीत प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेसाठी उप अभियंता (बांध) जि.प. उपविभाग वसमत यांनी नविन पंचायत समिती प्रशासकिय इमारत बांधकाम करणे व अनुषंगिक बांधकाम करणे बाबत या कामाचा नव्याने प्रस्ताव फाईल नंबर पंसई / २०२२, प्र.क्र. ७८ /बांध-४ शासनाकडे सादर करण्यात आला होता

या बाबत आमदार राजू भैया नवघरे यांनी सतत पाठपुरावा करुन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती केल्याने २ ऑगस्ट २०२३ रोजी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांना सदर प्रस्ताव मंजुरी बाबत लेखी पत्र पाठवण्यात आले होते या पत्राची दखल घेऊन ९ ऑगस्ट २०२३ रोजी सदर प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून या साठी ११ कोटी ३६ लाख ८७ हजाराचा निधी मंजुर झाला असुन लवकरच प्रशासकीय इमारत बांधकामास सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया आ.राजू नवघरे यांनी गौरव महाराष्ट्राचा शी बोलताना दिली आहे

News Category: 
Maharashtra

Sharing