ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रमुख रस्ते शहराला जोडण्याचा संकल्प - आ.राजू नवघरे,३४९ लक्ष रुपये निधीतून महागाव येथील जोड रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

फेरोज पठाण (संपादक) ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावातील प्रमुख रस्ते शहराला जोडण्याचा संकल्प हाती घेऊन त्या दिशेने काम सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार राजू नवघरे यांनी  ३४९ लक्ष रुपये निधीतून महागाव येथील जोड रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे

आ.राजु नवघरे यांच्या प्रयत्नातून वसमत मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे यातच तालुक्यातील महागाव रस्त्यावरील उर्वरित जोड रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजीत ३४९ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असून आज सोमवार रोजी या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन स्वतःहा मा.आ.राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे उपस्थित होते.या प्रसंगी आमदार राजुभैया नवघरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की वसमत विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या  विकासासाठी व शेतकरी,नागरिकांच्या दळण-वळणाच्या समस्या कायम सोडवण्यासाठी 
ग्रामीण भागाचे प्रमुख रस्ते शहराला जोडण्याचा संकल्प हाती घेऊन त्या दिशेने काम सुरु केले आहे या साठी मतदार संघात अधिक निधी रस्त्यांसाठी खर्च केला जात आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला महागाव येथील रस्त्याचा प्रश्न निकाली काढून महागावला शहराशी जोडण्याचा प्रयत्न याचाह भाग आहे आज या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन झाले या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती  आमदार राजू नवघरे यांनी उपस्थिताना दिली आहे

मतदार संघात राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची व विकास कामांची माहिती ही त्यांनी या वेळी दिली.

News Category: 
Basmat

Sharing