श्री योगानंद महाविद्यालयात माजी मंत्री डॉ.  जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

वसमत (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री तथा जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ .जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात दिनांक ३०/०८/२०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ .जयप्रकाश मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, श्री. राजेश मंचेवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

News Category: 
Basmat

Sharing