डॉक्टरांनी गोर-गरिबांना माफक दरात रुग्ण सेवा द्यावी - डॉ.क्यातमवार,रेनबो किड्स बाल रुग्णालयाचे स्थलांतरण थाटात संपन्न

वसमत (प्रतिनिधी)
रुग्णसेवा हीच पवित्र सेवा असून सेवा बजावत असताना डॉक्टरांनी तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष एम.आर. क्यातमवार  यांनी रेम्बो किड्स बाल रुग्णालयाच्या स्थलांतरण उदघाटन सोहळ्या प्रसंगी केले.

नुकतेच रेनबो किड्स बाल रुग्णालयाचे डॉक्टर लाईन सहारा बिल्डिंग येथे थाटात स्थलांतरण झाले या वेळी व्यासपीठावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे. शिश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार,माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज, खालील अहमद,माजी नगराध्यक्षा मनीषा कडतन,डॉ तुकाराम चव्हाण,डॉ छाया चव्हाण (अडकीने),वैशाली रावतोळे,एड सिराज आलम,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख अय्युब आदी मान्यवर उपस्थित होते‌.

या वेळी पुढे बोलताना डॉ. क्यातमवार म्हणाले की अगोदर नवजात बाल रुग्णांना उपचारासाठी नांदेडला जावे लागत होते आणि या साठी त्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता.पण आता वसमतलाच रेनबो किड्स या बाल रुग्णालयात नवजात शिशूच्या उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून डॉ.शारेक अहमद यांना मुंबई, दिल्ली,नांदेड सारख्या मोठा रुग्णालयातील रुग्णसेवेचा दांगडा अनुभव असून वसमत वासियांना त्यांचा अनुभवाचा निश्चितच फायदा होईल .
या वेळी डॉ.महेश रावतोळे. डॉ.गंगाप्रसाद बोरीवाले,डॉ. दीपक सातपुते,डॉ.शकेब अहमद यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाराष्ट्राचा चे संपादक फेरोज पठाण यांनी केले .
या वेळी शहरातील डॉक्टर्स. विधीतज्ञ,प्रतिष्ठित व्यापारी आदींनी या वेळी रेनबो किड्स बाल रुग्णालयाचे संचालक डॉ.शारेख अहमद यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

News Category: 
Basmat

Sharing