हुं.बहिर्जी विद्यालय कळमनुरीच्या मुख्याध्यापकपदी श्रीनिवास पुंडगे

कळमनुरी (प्रतिनिधी)
आज दिनांक २६/९/ २०२३ रोजी मंगळवारी बहिर्जी स्मारक विद्यालय प्राथमिक विभाग वसमत येथील ज्येष्ठ शिक्षक श्री पुंडगे श्रीनिवास राघोजी यांना सेवाजेष्ठतेनुसार बहिर्जी स्मारक उच्च प्राथमिक विद्यालय कळमनुरी येथे रिक्त जागेवर मुख्याध्यापक पदी बहिर्जी शिक्षण संस्थेने त्यांना पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केल्यामुळे त्यांनी आज कळमनुरी येथे जाऊन प्रभारी मुख्याध्यापक श्री विद्याधर मगर यांच्याकडून पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री आदमनकर सर श्री मस्के सर श्री हुंबाड सर श्री वाढवे सर तसेच वसमतचे वाघमारे डी टी या सर्वांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला तसेच काही नेतेमंडळीमध्ये अशोकराव वाढवे माजी नगराध्यक्ष उत्तमराव पातोडे सरपंच प्रकाश पाईकराव व विजय बलखंडे श्री आर के पुंडगे किशन बलखंडे, युवराज आवटे,आकाश दातार, गजभार, दिवाकर पुंडगे, विश्वजीत पुंडगे,शेषराव पातोडे तसेच महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगताप सर,संजय मगर,श्रीमती बलखंडे ताई, बाळासाहेब शिंदे या सर्वांनी श्रीनिवास पुंडगे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सन्मान केला.