अवैधरित्या दारु वाहतूक करणा-यावर कार्यवाही,वसमत ग्रामीण पोलिसांनी केला 1 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त

वसमत (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात अवैधरित्या दारु वाहतूक करणा-या एका इसमावर वसमत ग्रामीण पोलिसांनी कार्यवाही करत त्याचा कडून 1 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे
वसमत ग्रामीण हद्दीत मोहगाव पाटी येथे इसम नामे ऋषी रंगनाथ ढोकणे वय 25 वर्ष राहणार बोल्डा हा अवैधरित्या देशी व विदेशी दारू ची वाहतूक करताना मिळून आला असता त्याच्या ताब्यातून मॅकडॉल नंबर वन च्या 44 बॉटल,10 रम व देशी च्या छोट्या बॉटल 108 असा 16,200 चा मुद्देमाल तसेच स्कुटी त्याची अंदाजे किंमत 1,00,000/- रुपये असा एकूण मुद्देमाल 1,16,200/-रुपये किंमतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पुढील तपास सपोनि अनिल काचमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
News Category:
Basmat