इल्म अकॅडमीच्या करिअर मार्गदर्शन शिबिरास उदंड प्रतिसाद,मान्यवरांनी वसमत येथील असंख्य विद्यार्थ्यांना गिरवले भविष्य घडवीण्याचे धडे



वसमत (प्रतिनिधि)
वसमत तालुक्यात नुकतीच सुरू झालेल्या इल्म अकॅडमी कडून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना व पालकांचा करिअर मार्गदर्शन शिबिर दि. 14 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11.00 वा विजवीरतरण कार्यालय समोर,कारखाना रोड, येथे संपन्न झाले या वेळी मान्यवरांनी असंख्य विद्यार्थ्यांना भविष्य घडवीण्याचे धडे गिरवले
या कार्यक्रमास मार्गदर्शक प्रमुख वक्ते म्हणून श्री तानाजी भोसले, गट शिक्षण अधिकारी औंढा तर उच्च शिक्षणाची गरज विषयावर श्री एस एम समीम संचालक रेडीएन्ट अकॅडमी नांदेड (स्पर्धा परीक्षा व सिविल सर्विसेस), श्री डॉ शारेक अहमद, रेनबो किड्स हॉस्पिटल वसमत (आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व), श्री आमीर खान, मोटीवेशनल स्पीकर, परभणी (व्यक्तिमत्व विकास व कॅरिअर मार्गदर्शन) श्री प्रा. तडवी पठाण ई ई, शासकीयतंत्र निकेतन हिंगोली (इंजीनीयरींग व टेक्नोलॉजी) म्हणून यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले या सोबतच उच्चशिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रे तयार करण्याबाबत व शिष्यवृत्ती चे मार्गदर्शन श्री इबादूर रहेमान यांनी केले कार्यक्रमात विविध कॉलेज चे स्टॉल विद्यार्थ्यांना व्यक्ति:शा मार्गदर्शन करण्यासाठी लावण्यात आले होते
आपल्या पाल्याच्या भविष्याकरीता योग्य मार्ग निवडण्यासाठी सर्व पालक व विद्यार्थ्यांना इल्म अकॅडमीचे संचालक श्री वासिम सिद्दीकी, श्री इकरार खान व श्री मिनहाज अहमद यांनी संयोजक म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना इल्म अकॅडमी सदैव मार्गदर्शनासाठी खुले आहे असे आश्वासन दिले
तसेच या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, पत्रकार बंधू व जवळपास 250 विद्यार्थी व पालकांनी आपला सहभाग नोंदवला.
इल्म अकॅडमीच्या संचालकांचा सत्कार
वसमत येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी वसमत तालुका पत्रकार संघातर्फे इल्म अकॅडमीच्या संचालकांचा सत्कार करुन पत्रकार संघाचे अध्यक्ष फेरोज पठाण,पत्रकार नासर पठाण,शेख खदिर, खदीर अहेमद आदींनी शुभेच्छा दिल्या