राजश्री शाहू महाविद्यालय येथे पालक मेळावा व गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

(लातूर प्र.) लातूर येथील श्री राजश्री शाहू महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बीए प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे, उपप्राचार्य सदाशिव शिंदे, जिल्हा माहिती कार्यालयाच्या श्रीमती आशा बंडगर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अनिशा अगरकर, गुनपाल शिंदे आणि कुमारी जयश्री जाधव यांचा शाल, श्रीफळ , स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित पालकांमधून श्रीमती आशा बंडगर यांनी सर्व पालकांचे प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त करून बीए प्रथम वर्षात शिकणाऱ्या सर्व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉक्टर गव्हाणे यांनीही अनमोल मार्गदर्शन केले .
तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या सर्व गुणवंतांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक माधव शेळके यांनी केले केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नितीन पांचाळ यांनी केले..