माहेर हॉस्पिटलच्या प्रयत्नातून मर्सुल येथील दोन युवक मृत्यूच्या दारातून परतले

वसमत (प्रतिनिधी) तालुक्यातील मर्सुल येथील दोन युवकांना उलट्या संडासाचा त्रास होत असताना अतिशय कमी बीपी वर पोहोचलेल्या सदर रुग्णांना योग्य उपचार पद्धतीचा वापर करून माहेर हॉस्पिटलचे श्री व सौ डॉक्टर खान यांनी मृत्यूच्या दारातून परत आणण्याची एकच चर्चा तालुका भरात होत आहे
तालुक्यातील मर्सुल येथील रहिवासी असलेले परमेश्वर कांबळे व राम मस्के यांना शनिवारी अचानकपणे संडास उलटीचा त्रास सुरू झाला जवळपास साठ ते 70 संडास उलट्या झाल्यानंतर त्यांना अतिशय गंभीर परिस्थिती मर्सुल येथून वसमतच्या माहेर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळेस दोन्हीही पेशंटची नाडी लागत नव्हती व बीपी हे शून्य वर पोहोचला होता तसेच तपासण्या केले असता किडनीने ना काम करन बंद केले आहे असे स्पष्ट झाले अशा परिस्थितीत देखील पेशंट हे पुढे कुठेही न पाठवता माहेर हॉस्पिटल येथे उपचार देण्यात आले आणि बुधवारी पेशंटची सुखरूप घरी सुट्टी करण्यात आली पेशंटनी व पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर सना उल्ला(MBBS MD MEDICINE) खान यांचे आभार मानले डॉक्टरांनी याचे कारण दूषित पाणी किंवा दूषित जेवण असू शकते असे स्पष्ट केले