लाखांचा पोशिंदा प्रयोगविर जयप्रकाश जी दांडेगावकर साहेब

झाले बहु,होतील बहु ,
आहेतहीबहु, परंतु यासम हा.
सहकारमहर्षी जयप्रकाश जी दांडेगावकर साहेबांच जिवन आणि कार्य अतिशय उदबोधक अशा प्रकारच आहे. आपल्या दीर्घ आयुष्यात साहेबांनी सहकारातून समृद्धीकडे हे तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व थरांतील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर उद्योगाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. साखर उद्योगाच चालत बोलत विद्यापीठ म्हणून भारत देश त्यांच्याकडे पाहतो.त्यांच्या मताशी सहमत नसानाऱ्यांना सुद्धा त्यांचा सल्ला घ्यावा लागला, जसा तो सल्ला देनाराचा मनाचा मोठेपणा होता तसाच सल्ला घेणाऱ्याचा सुद्धा मोठेपणा होता. जेंव्हा जेंव्हा साखर उद्योगाचा इतिहास लिहल्या जाईल तेंव्हा तेंव्हा इतिहासकाराला जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब या नावापाशी क्षणभर थांबावं लागेल.ते विद्वान, व्यवहार कुशल,रसिक आणि सर्वसामान्यांमध्ये वावरलेले असल्याची साक्ष त्यांच्या वागण्या बोलण्यातून येते.
आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे स्व. यशवंत रावजी चव्हाण साहेब आणि वसंत दादा पाटील या नेत्यांच्या विचारांचा जागर करताना साहेब तसूभरही मागे हटत नाहीत. मग ते एखाद राजकिय व्यासपीठ असेल किंवा विचारमंच असेल. कृषी औद्योगिक महाराष्ट्र हे यशवंत रावजी चव्हाण साहेबांचे स्वप्न होते. आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून ते स्वप्न साकार करणारांपैकी एक म्हणजे वसंत दादा पाटील. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांच्या गोळया अंगावर झेलून स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन ब्रिटिश तुरुंग फोडणारा क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी म्हणजे वसंत दादा पाटील. अशा थोर नेत्यांचा सहवास आदरणिय साहेबांना लाभला आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या सहवासातून साहेबांचा विचार परीघ विस्तृत होत गेला.आणि आपल्या परिसराचे नंदनवन झाले, सर्व सामान्यांचे जीवन मान उंचावले.
पूर्णा कारखान्या बरोबर किंवा नंतर आपल्या मराठवाड्यात कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढली मात्र काळानुरूप बदल न केल्यामुळे बरेच कारखाने अवसायनात निघुन बंद पडले. गेली चार ते पाच दशकांपासून पूर्णा कारखान्याची चिमणी पेटती ठेऊन लाखो लोकांच्या घरात प्रकाशाची किरणे पोहोचवण्याचे काम आदरणिय दांडेगावकर साहेबांनी केलं.ती केवळ पूर्णा कारखाना चिमणी नसुन लाखो लोकांच्या चुली आहेत. 2011ते 2020पर्यंतचा सतत पडणारा दुष्काळ आणि अचानक आलेली कोरोनाची महामारी यामुळे कारखान्याची आर्थिक घडी विस्कटली कारखान्याची बॅलन्स सीट बिघडली आणि कारखानदारी आर्थिक संकटात सापडली, कोरोनाच्या काळात एकीकडे माणसे जीव सांभाळून घरात बसत होती तर दुसरीकडे साहेब कर्जा साठी, आणि संस्था वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता पायाला भिंगरी असल्यागत फिरत होते. कोरोना काळात सुद्धा साहेबांच्या घराचे दरवाजे 24तास सर्व सामान्यांसाठी खुले होते हे आम्ही विसरलो नाहीत साहेब.वेळेची किंमत अगदी द्रव्याप्रमाने Time is money हा आधुनिक सिद्धांत मागील चार दशकांत साहेबांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवला.
काळाची गती ओळखुन साहेब ज्या शिताफीने आणि धैर्याने निर्णय घेतात त्यांची सर कोणालाही येत नाही. शक्तीने सत्ता मिळवता येते पण ती युक्तीने चालवावी लागते. मिळालेल्या संधीच सोन करण हाच त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा मुहूर्त असतो. साहेब 2010 साली मराठवाड्यातील पहिला सहविजनिर्मिती प्रकल्प राबवत असताना आपला कारखाना कर्जामुळे डबघाईला येऊन बंद पडू शकतो म्हणून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आदरणिय साहेब सहविजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग राबवतात आणि काही वर्षानंतर शासनाकडून सहविजनिर्मीती प्रकल्प सुरू करण्यासाठी देशातल्या प्रत्येक कारखान्यालाआदेशित केल्या जात.C.b.g.(compress biogas ) प्रकल्प निर्मिती साठी पूर्णा कारखाना येथे वार्षिक सभेमध्ये सन्मा सभासदांच्या संमतीने ठराव पारीत केल्या जातो आणि लगेच दुसऱ्या दिवशी शासनाकडून c.b.g. प्रकल्प उभा करणे साठी देशातल्या कारखान्यांना सूचना दिल्या जातात यातुन आदरणिय साहेबांची दुरदृष्टी आणि त्यांच अप्रतिम टाईम मॅनेजमेंट बघितलं की थक्क व्हायला होत. काळा वरही कस स्वार झाल पाहिजे याचा प्रत्यय सहेबांनी केलेल्या कामातून येतो. डिस्टीलरी असेल, सहविजनिर्मिति असेल, इथेनॉल प्रकल्प असेल किंवा टाकाऊ मळी पासुन प्रक्रिया केलेला दर्जेदार सेंद्रिय खत असेल ह्या सगळ्या केलेल्या प्रयोगातून केवळ संस्था आणि सभासदांच भल झालेल आहे. आपल्याच परिसरात असलेले आजु बाजुचे कारखानदार मळी पासुन प्रक्रिया केलेल्या खतांची चढ्या दराने विक्री करून त्यातुन करोडो रुपये मुनाफा कमावत असताना आपल्या कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक ठिकाणी अर्थकारण न पाहता शेतकरी बांधवांसाठी अतिशय तुटपुंज्या किंमतीमध्ये दर्जेदार सेंद्रिय खत निर्माण करून उपलब्ध करून दिला. तसेच ह्या होऊ घातलेल्या c.b.g.प्रकल्पाकडे केवळ इंधन म्हणूनच नाही तर या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीपासुन प्रक्रिया करून डी. ए. पी.आणि एस. एस. पी. खताला पर्याय म्हणून वापरात येणारा खत सुद्धा शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सोयाबिन, कापुस,ह्या पिकांना पर्याय म्हणून नेपियर गवत अधिक उत्पन्न देणारे आहे. शिवाय कमी पाण्यात आणि खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा हे पीक घेण्यासाठी फायदेशीर राहील. एकरी वार्षिक उत्पन्न १००ते १२० टणापर्यंत उत्पन्न देणारे हे नेपियर गवत शेतकरी बांधवांसाठी नक्कीच नवसंजीवनी देणार पिक ठरेल.
साहेबांनी कारखानदारी कडे केवळ साखर उद्योग म्हणून पाहिल असत तर आपला कारखाना केंव्हाच बंद पडला असता. साखर हे खाद्यान्न असल्यामुळे त्याचे दर निश्चित केलेले असतात. इंधन ही जीवनावश्यक आणि काळाची गरज बनली आहे. त्यामूळे अशा महत्वा कांक्षी प्रकल्पाला जर काही अंशी विरोध होत असेल तर विरोध करणारांची संकुचित बुद्धी किंवा यामागे राजकिय आकस असु शकतो.आणि तसे असेल तर ही खुप मोठी शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल.
अनेक दृष्टीने आदरणिय दांडेगावकर साहेबांच्या जिवनाचा बारकाईने अभ्यास करणे खुप गरजेचे आहे. आत्ताच्या काळातील इमेज मेकिंग व पॉलिटिकल ब्राँडींगच्या भाऊ गर्दीत नवनवीन नेते तयार केले जात असताना,आपण जर एका सुसंस्कृत, उदारमतवादी.लोककल्याणकारी आणि लोकशाहीवादी राजकारणाची अपेक्षा करत असलो तर आपल्याला आदरणिय दांडेगावकर साहेबांच बोट धरून चालण गरजेच आहे.
शब्दांकन
नागनाथ नारायण डाढाळे
वाखारीकर
मो.न.7559475467