जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वां शरदचंद्र पवारांची शुक्रवारी वसमतला जाहीर सभा

वसमत (प्रतिनिधी) : 92 वसमत विधानसभा महाविकास विकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषद मैदान वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वां शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावर शरद पवार यांच्या विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
या सभेसाठी माजी मंत्री अशोक पाटील, राज्यसभेचे खासदार फौजिया खान, हिंगोलीचे खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.प्रज्ञाताई सातव,माजी आ.संतोष टार्फे आदी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
सभेची जय्यत तैयारी करण्यात येत असून सभेत वसमत विधानसभा मतदार संघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ.हफिज अ.रहेमान, डॉ.एम.आर क्यातमवार, शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन,
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख सुनिल भाऊ काळे,तालुकाप्रमुख डॉ.डी.बी.पार्डीकर, शहरप्रमुख काशिनाथ भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दौलत हूंबाड, शहराध्यक्ष शेख अय्युब आदींनी केले आहे.