रविवारी भव्य वसुमती मॅरेथॉन स्पधेचे आयोजन,राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक,आ.राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते स्पधेचे उद्घाटन

वसमत (प्रतिनिधी) रविवारी वसमतला भव्य वसुमती मॅरेथॉन स्पधेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे उद्योग सार्वाजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आ.राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
आ.राजुभैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शन,पुढाकार व राजुभैय्या सेवाप्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच "माझे शहर तंदरुस्त शहर" रहावे या उद्देशाने मागील वर्षी पासून सुरू झालेली मैरेथॉन स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी ही वसुमती मॅरेथॉन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून रविवार दि ५ जानेवारी २०२५ रोजी मयुर मंगल कार्यालय वसमत येथुन सकाळी ठिक ७ वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार आहे
वेगवेगळ्या गटातील मुलां-मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत त्या-त्या गटातील विजेत्यांना क्रमांका नुसार बक्षीस जाहीर करण्यात आले आहे
या मध्ये १७ वर्ष वयोगट मुले व मुली तसेच १८ वर्षासमोरील पुरुष व महिला प्रौढ (खुल्या) मैरेथॉन स्पर्धा असून १७ वर्ष मुले व मुलीसाठी ३ कि.मी. धावायाची स्पर्धा आहे मुलींचा व मुलांचा वेगळा गट असणार आहे या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील प्रथम येणा-या मुले व मुलिंना प्रथम बक्षीस ७०००,द्वितीय ५०००, तृतीय ३०००,चौथे २०००, पाचवे
बक्षीस २०००,सहावे बक्षीस ते विसावे बक्षीस प्रत्येकी ५०० रूपये धावणाऱ्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे
तसेच १८ वर्षा वरील पुरुष गटातील स्पर्धकांना १० कि.मि. धातुन स्पर्धा जिंकायची आहे यात प्रथम येणा-या पुरुषास १५०००, द्वितीय ११०००,तृतीय ७०००,चौथे बक्षीस ५०००, पाचवे बक्षीस ३००० व सहावे ते विसावे क्रमांकापर्यंत येणाऱ्या प्रत्येकास १००० बक्षीस असेल त्याच बरोबर महिला गटासाठी या स्पर्धेत ५ कि. मि. धावण्याची स्पर्धा असुन यात प्रथम बक्षीस १५०००, द्वितीय बक्षीस ९०००, तिसरे बक्षीस ७०००, धीचे बक्षीस ५०००, पाचवे बक्षीस ३०००, व सहावे ते विसावे पर्यंत प्रत्येकी १००० अशा पद्धतीने या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे
या स्पर्धेत प्रवेश देण्यासाठी ५१ रूपये स्पर्धा फीस आकारण्यात आली आहे या स्पेंसाठी आतापर्यंत १५७५ नावांची नोदणी झाली असून किमान २००० स्पर्धक या मैरेथॉन स्पर्धेत धावतील असा अंदाज आ.राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमामा ढोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.