गुरु पादेश्वर महाराज वाहनावरील हल्ला प्रकरण उघडकीस, महाराजां वरील हल्ला प्रकरणी नांदेडच्या दोघांना अटक  मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी कारस्थान रचल्याची कबुली महाराजांच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा तो "स्वामी" कोण.?

वसमत (प्रतिनिधी) नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसमत विधानसभा  मतदारा संघाच्या निवडणुकीतील उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पथकाने छडा लगावत नांदेडच्या दोघांना  आज रविवार दि १९ जानेवारी रोजी पहाटे अटक केली आहे 

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत
वसमत विधानसभा मतदार संघातुन गिरगाव मठाचे मठाधिपती गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे निवडणुक रिंगणात होते. निवडणुकीत प्रचारा दरम्यार  १९/११/२०२४ रोजी  महाराजांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून जखमी केल्याबद्दल पो.स्टे.वसमत ग्रामीण येथे गुरनं. २८४/२०२४ कलम १२५, ३२४(४), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पो.स्टे.वसमत ग्रामीण येथे केल्यानंतर सदर गुन्हा तात्काळ उघडकीस येण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर गुन्हयाचा तपास पो.नि.विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग केला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमुन सदर गुन्हयाचा तपास करण्यात येत होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,गोपनिय बातमीदार व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्हयातील  गुरुपादेश्वर महाराज यांची गाडी फोडणारे आरोपी नामे १) भुजंग माधवराव निरदोडे, २) संकेत भास्कर भोसले,दोन्ही रा. शिवराई नगर, मालेगाव रोड,नांदेड यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीतांनी  गुरूपादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणुकीस उभे राहिल्यामुळे त्यांना मतदारांची सहानुभुती मिळावी या उददेशाने आमच्या ओळखीचे स्वामी,रा.नांदेड यांच्या सांगण्यावरून श्री गुरूपादेश्वर महाराज यांची गाडी गिरगाव पाटी रोडवर फोडल्याची कबुली दिली त्यावरून आरोपीतांना ताब्यात घेतले असुन सदर गुन्हयात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का ? या बाबत पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्रीमती अर्चना पाटील,पो.नि. स्था.गु.शा.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे सपोनि. शिवसांब घेवारे, पोउपनि विक्रम विटुबोने,पोउपनि कपील आगलावे, पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण, गजानन पोकळे, कुमार मगरे,राजु ठाकुर,लिंबाजी वाव्हळे,रविकुमार स्वामी,निरंजन नलवार,आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर,नरेंद्र साळवे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे,इरफान पठाण,प्रदिप झुंगरे यांनी केली.

या महाराजांच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा तो "स्वामी" कोण.? या  प्रकरणी आरोपींचा शोध सुरु आहे.

सामाजिक एकोपा दुषित करणारे लोक तोंडघशी पडल्याची चर्चा - 

सहानुभूतीस लाटण्यासाठी झालेला हा हल्ला असल्याचे पोलीस अचुक तपासात उघडकीस आले 

महाराजांवर हल्ला करून संशयाची सुई एका विशिष्ट समाजाकडे वळवून
सामाजिक एकोपा दुषित करुन दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या वृत्तीचे लोक तोंडघशी पडल्याची शहरात चर्चा आहे

Sharing