थोरावा पाटी जवळ ६० वर्षीय शेतक-यास लुटले,तीन जनावर रॉबरीचा गुन्हा दाखल,वसमत ग्रामीण पोलिसांनी काही तासातच आरोपिंना केले जेरबंद

 वसमत (फेरोज पठाण)
परभणी महामार्गावर असलेल्या थोरावा ते खांडेगाव पाटी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यास अडवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम  लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली दरम्यान शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवत काही तासातच  आरोपी केशव अशोक पांचाळ वय २३ वर्ष, अनिकेत माधव पांचाळ वय २४ वर्ष, दीपक प्रकाश पांचाळ वय ३६ वर्ष सर्व रा.थोरावा ता वसमत या तिन्ही आरोपींना जेरबंद केल्याने वसमत ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे

अधिक माहिती अशी की रमेश गोमाजी श्रावणे वय ६० वर्ष रा.पुयनी (बु) ता वसमत ह.मु.जयनगर परभणी रोड यांना दि २९ जानेवारी रोजी रात्री ९:४० च्या सुमारास थोरावा ते खांडेगाव पाटी दरम्यान निसर्ग धाब्याजवळ अज्ञात चोरट्यांनी अडवुन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील ७ हजार रुपये रोख लुटले व घटनेच्या साक्षीदाराच्या ऑटोचे काच फोडून त्यास मारहाण करुन तेथून पसार झाल्याची तक्रार शेतकरी श्रावणे यांनी वसमत ग्रामीण पोलीसात दिली

उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे यांनी तपास चक्रे फिरवत,फौजदार डक,पोलीस कर्मचारी अंबादास विभूते,साहेबराव चव्हाण, रामेश्वर लोखंडे यांच्या पथकास सह ३ आरोपींना काही तासाच्या आत ताब्यात घेतले 

सदर तिन्ही आरोपींना आज गुरुवारी वसमत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
प्रकरणाचा तपास सपोनि बोराटे करीत आहेत

परिसरात यापूर्वी झालेल्या रोड रॉबरीच्या घटनेत सदर आरोपींचा समावेश आहे का ? व यात अजून कोणी आरोपी सहभागी आहे का ?या बाबत पोलीस यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे 

रोड रॉबरीच्या घटनेने तालुका भरात चर्चेला उधाण आलेला असताना वसमत ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या मुस्क्या आवळल्याने पोलीस विभागाचे  सर्वत्र कौतुक होत आहे

News Category: 
Basmat

Sharing