सय्यद इम्रान अली वेल्फेअर फोंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळा २६ एप्रिलला,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

 वसमत (प्रतिनिधी) इंजिनियर सय्यद इम्रान अली वेल्फेअर फाऊंडेशन वसमत च्या वतीने २६ एप्रिल रोजी दुसरा सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे निश्चित झाले असून वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सह मान्यवरांची राहणार यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख मोबिन जमिनदार यांनी दिली आहे

जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणारे प्रेषित महोमद पैगंबर यांनी ( निकाह को आसान करो) ची दिलेली आदर्श शिकवण डोळ्यासमोर ठेवुन मागील वर्षीपासून सय्यद इमरान अली वेल्फर फाउंडेशनच्या वतीने वसमतला सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येत आहे मागे २०२४ मध्ये २९ जोडप्यांचा भव्य दिव्य सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाल्या नंतर या वर्षी २६ एप्रिल २०२५ रोजी ५० जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे 

या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनाखाली वेल्फेअर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने
आज मुंबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांची मुंबई येथे गोदावरी बंगल्यावर भेट घेऊन त्यांना  उपमुख्यमंत्री झाल्या बाबत शुभेच्छा दिल्या व आयोजित विवाह सोहळ्याची संक्षिप्त माहिती देवून यात  येण्यासाठी निमंत्रण दिले असता वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन नामदार अजितदादांनी शिष्टमंडळास दिली
तसेच शिष्टमंडळाने अनेक मान्यवर मंडळींची भेट घेऊन विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे

या वेळी आ.राजूभैया नवघरे,इं सय्यद इम्रान अली,मो.मोबीन जमिनदार,बबलू सेठ हिंगोली,शेख परवेज हिंगोली आदींची उपस्थिती होती

News Category: 
Maharashtra

Sharing