शहरात नळाला पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत करुन हातपंप दुरुस्ती करा,वसमत शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे मुख्याधिका-यांना साकळे

वसमत (प्रतिनिधी) वसमत शहरात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता नळाला पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत करुन त्वरित हातपंप दुरुस्ती करण्याचे साकळे वसमत शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष अमजद खान नम्मू व पदाधिकार्यांनी मुख्याधिका-यांना घातले आहे

या बाबत केलेल्या लेखी मागणी पत्रात नमूद करण्यात आले की शहरात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे शहरातील विविध वार्डात किमान दोन ते तीन आठवड्यात एकदा नळाला पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत उन्हाळा सुरू झाला आहे हात पंपाला पाणी कमी होत आहे म्हणून पिण्याचे पाणी कमी होत चालले आहे काही दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी सुरळीत येत नाही व अनेक हातपंप ना दुरुस्त आहेत शहरात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता  आपल्या कार्यालयामार्फत त्वरित उपाययोजना करुन नागरिकांचा जिवाहळ्याचा प्रश्न मार्गी  लावण्याची लेखी मागणी मुख्याधिकारी वसमत यांना करण्यात आली आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत शहर कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू सह भीमराव सरकटे,सय्यद नय्यूम, शेख मुजामिल, असलम बाबा,युनूस खान पठाण,किशोर बसवंते,विनोद चव्हाण,अनिकेत नामपल्ली आदींच्या स्वाक्ष-या आहेत

News Category: 
Basmat

Sharing