बारगाह-ए-इर्फानी येथे रमजान वेळापत्रकाचे प्रकाशन

वसमत (प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान माहिण्या निमित्त रोजे ठेण्यासाठी सहेरी व इफ्तारच्या वेळेची माहिती देणारे रमजान वेळापत्रकाचे प्रकाशन रविवारी  बारगाह-ए-इर्फानी च्या वतीने करण्यात आले

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना १ मार्च २०२५ पासुन सुरु झाला असून पहिल्या रोजा निमित्त वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत मौलवी सय्यद अब्दुल जब्बार साहब (रह.) समिती ने हकीम उमरबीन अहेमद अलमारुख फैजअलीशाह इर्फानी बंदानवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली रोजे ठेण्यासाठी सहेरी व इफ्तारच्या वेळेची माहिती देणारे उपयुक्त रमजान वेळापत्रकाचे प्रकाशन रविवारी बारगाह-ए-इर्फानी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

      या वेळी माजी सेवानिवृत्त नायब तहसीदार सय्यद माहेमुद,सय्यद खलील इर्फानी,जलील बागवान,हाफीज रहीम, महंमद अय्युब,जाविद बागवान,अमजद पठाण,फैयाज पठाण,अस्लम कुरेशी,बब्बू बागबान,शेख अली आदी सह समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होत

News Category: 
Basmat

Sharing