डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सय्यद इम्रानअली तर कार्यध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची बिनविरोध निवड

वसमत (प्रतिनिधी)
१४ एप्रिल २०२५ रोजी होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी इंजिनियर सय्यद इमरानअली नासरअली यांची तर कार्यध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील सभागृहात रविवारी सकाळी पुतळा समितीचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आ.राजुभैय्या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सर्वानुमते शांतिदुत सार्वजनिक जयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली
वसमत येथील बुद्ध, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या सार्वजनिक शांतिदूत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे युवानेते इंजिनियर सय्यद इमरान अली यांची तर कार्याध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसचे राजकुमार एंगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मा. जयप्रकाशजी दांडेगावकर व आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार एंगडे यांच्या कुशल नियोजनात मागच्या २८ वर्षापासून विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांना आदरांजली अर्पण करण्यात येते.
ज्यात प्रामुख्याने दरवर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी व्याख्यान, तैलचित्राची भव्य मिरवणूक, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, रांगोळी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, भीम गायन जंगी मुकाबला, १८ तास अभ्यास, बुद्धिबळ स्पर्धा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावर्षी दिनांक १ मे २०२५ रोजी नागपूर येथील सुप्रसिद्ध भीम कव्वाल (बाप भीमराव रहेगा फेम) फैजान ताज यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी वसमत वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड.रणधीर तेलगोटे,यशवंत उबारे,एस.पी.मुळे, बी.एस.खिल्लारे, राजकुमार एंगडे, प्रा.सुभाष मस्के, गोरख पाटील,गौतम मोगले,श्रीरंग थोरात, विजयकुमार एंगडे, गौतम दवणे,भीमराव सरकटे,विनोद चवाहन,सय्यद मसूद, छोटू कठाळे, संघपाल इंगोले आदींची उपस्थिती होती
सर्व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान शांतीदुत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.