काश्मिर येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त वसमत कडकडीत बंद,कॅन्डल मार्च सह शहरातील मस्जिदित प्रार्थना





वसमत (प्रतिनिधी)
काश्मिर मधील पहलगाम येथे मंगळवारी दि.२२ रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना शनिवारी सकल हिंदू बांधवानी वसमत बंद ची हाक दिली होती त्यास सर्व धर्मीय व्यापा-यानी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडले
सकाळी ११ वाजता शहरातील ऐतिहासिक झेंडा चौक येथे शोक सभा घेऊन हल्यातील बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेला हा हल्ला अत्यंत भ्याड,निर्दयी तसेच मानवतेला काळिमा फासणारा आहे.अशा हल्ल्यास सरकारकडून कठोरपणे उत्तर देणे आवश्यक असल्याची एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली
दरम्यान झेंडा चौक येथुन उपविभागीय कार्यलय येथे मोर्चाच्या स्वरुपात पोहचून या घटनेचा निषेध नोंदवत निवेदन सादर करण्यात आले
या वेळी आमदार आ.चंद्रकांत ऊर्फ राजुभैय्या नवघरे,गणेश काळे,सीताराम म्यानेवार,सुनिल भाऊ काळे,श्रीनिवास पोराजवार,डॉ.डी.बी.पार्डीकर,काशीनाथ भोसले,विष्णु बोचकरी,वैजनाथ गुंडाळे, लक्ष्मीकांत कोसलगे,मौलाना महोमद अखिल,अँड.शेख मोहसिन,प्रकाश शहाणे,तानाजी बेंडे,हाफिज फेरोज,प्रभाकर सिरसागर,महोमद मोबिन,उजवला तांभाळे मैडम,सचिन दगडू आदी सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसचा कॅन्डल मार्च
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री वसमत शहर व तालुका काँग्रेस ने फातेमा कॉटेज मोंढा येथून कॅन्डल मार्च (मेणबत्ती मोर्चा) काढण्यात येवून ऐतिहासिक झेंडा चौक येथे पोहचून या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पण केली या वेळी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची चिटणीस अब्दुल हफीज अब्दुल रहेमान,शेख अलीमोद्दीन,अँड ऋषिकेश देशमुख, रविकिरण वाघमारे, अ.तोहीद अफजल
आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
बि.वाय.सी फाउंडेशनचा कॅन्डल मार्च
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवणारी युवकांची संस्था बि.वाय.सी फाउंडेशन ने शहरातील मामा चौक येथुन कॅन्डल मार्च काढत झेंडा चौक येथे हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण केली या वेळी फाउंडेशनचे नविद बागवान,अस्लम खान,पठाण सलमान खान,अँड शेख समीर,शेख अलीम आदी सह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
मस्जिदित हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांसाठीं प्रार्थना-
शुक्रवारच्या विशेष नमाज नंतर शहरातील सर्वात मोठी मस्जिद बेनजिरजहाँ मंगलवारा,झेंडा चौक येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो अशी दुवा (प्रार्थना) ही या वेळी मौलाना इम्तियाज बंद दरम्यान बरकाती यांनी केली
याच प्रमाणे शहरातील असंख्य मस्जिदित प्रार्थना करण्यात आली
वसमत बंद दरम्यान पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता