लिमरा उर्दू ज्युनियर कॉलेज ची यशस्वी घोडदौड,विज्ञान शाखेत 100% तर कला शाखेत 70% यश संपादन

वसमत (प्रतिनिधी)
हजरत खान -ए-आलम एज्युकेशन कॅम्पस लिमरा उर्दू ज्युनियर कॉलेज ची यशस्वी घोडदौड
सुरु असून यंदाही उत्कृष्ट निकालासह आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान,सचिव सौ.सिमा अब्दुल हफिज यांनी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले असून ही प्रगती अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे.
निकालामधील प्रमुख यशस्वी विद्यार्थी:-
विज्ञान शाखा:-
माहीनजहाँ शेख मोहसीन – 75%
शेख हुस्ना फारिहा शेख जमीर – 70%
जोहा नुजहत शेख अब्दुल रशीद – 69 %
कला शाखा:-
मुस्कान बानो शेख रहीम – 75%
मसीरा अनम अब्दुल रौफ – 73%
मदिहा फातेमा मोहम्मद अन्वर – 72%
ही उज्ज्वल यशोगाथा प्राचार्य काजी कौसरजहाँ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शक्य झाली असून,
शबाना मैडम,रुबिया मैडम,सोहेल सर,अजीम सर,मोबिन सर
आणि मार्गदर्शक रशिदोद्दीन सरांची मेहनत या मागचे फलीत आहे
लिमरा उर्दू ज्युनियर कॉलेज ने विज्ञान शाखेत 100% तर कला शाखेत 70 % यश संपादन केले आहे ही संस्था भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा यथास्थित राखेल, असा विश्वास संस्थेच्या सचिव सौ सिमा हफीज यांनी व्यक्त केला आहे.