राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या प्रदेश सचिवपदी यासर शेख हबीब

वसमत (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या प्रदेश सचिवपदी वसमत येथील युवा कार्यकर्ते शेख यासर शेख हबीब यांची नियुक्ती करण्यात आली असुन या बाबतचे नियुक्ती पत्र पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उप मुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते आज मुंबई येथे देण्यात आले
आ.राजुभैय्या नवघरे यांच्या शिफारशी वरुन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने
शेख यासीर शेख हबीब यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या युवक प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली या बाबतचे नियुक्ती पत्र ना.अजीत दादा पवार यांच्या हस्ते आज मुंबई येथे देण्यात आले
युवक प्रदेश अध्यक्ष मा.सुरज दादा चव्हाण,आ.राजु भैय्या नवघरे सह मान्यवरांनी शेख यासर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
News Category:
Maharashtra