वसमत येथील पारधी समाजाचे नेते सुदर्शन शिंदे यांना राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण

वसमत (प्रतिनिधी)

वसमत येथील पारधी समाजाचे युवा नेते सुदर्शन शिंदे यांनी पारधी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती भवनाने त्यांना निमंत्रित केले आहे शिंदे दि २१ जुलै रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत

राष्ट्रपती कार्यालयाकडून सुदर्शन शिंदे यांना या बाबतचे पत्र प्राप्त झाले आहे सदर पत्रात नमूद करण्यात आले की भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या वतीने,आदिवासी व्यवहार मंत्रालयाला कडून भारताचे माननीय राष्ट्रपती २१ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:०० ते २:०० या वेळेत नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रातील प्रख्यात आदिवासी व्यक्तींशी संवाद साधणार आहेत,त्यानंतर आदिवासी समुदायां बाबत अधिक प्रभावी धोरणे आणि उपक्रम तयार करण्यात तुमचे अंतर्दृष्टी योगदान देतील अशी अपेक्षा आहे.
या प्रतिष्ठित प्रसंगी उपस्थित राहण्या बाबत पत्रात नमूद केले आहे 

     भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे हे मागील अनेक वर्षापासून पारधी समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतात त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रपती महोदयांनी घेतल्याने पारधी समाजातून राष्ट्रपती महोदयांचे आभार व्यक्त केले जात आहे
 

पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करेल 

मा द्रौपतीजी मुर्मू महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांनी माझ्या पारधी आदिवासी समाजामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन मला  राष्ट्रपती भवन दिल्ली इथे आमंत्रित केले आहे त्याबद्दल महामहीम राष्ट्रपती महोदय तसेच भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद 

सुदर्शन शिंदे
 प्रदेश महामंत्री भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्र

Sharing