राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अ.स जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्षांची नियुक्ती



वसमत (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष ची आज मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनात आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल हिंगोली जिल्हाध्यक्ष पदी शेख अय्युब पॉपुलर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहर अध्यक्ष पदी माजी नगरसेवक ऍड शेख मोहसीन शेख करीमोद्दीन तर कार्याध्यक्षपदी मंगेश तनपुरे यांची नियुक्ती केली आहे
या प्रसंगी आ.शशिकांत शिंदे यांनी पक्ष वाढवणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी कसे होतील या साठी प्रयत्न करण्याच्या काही सूचना देखील नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या
आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी शहरात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न चालवले आहेत
यावेळी प्रकाश इंगळे सर,निसार पेंटर,जावीद जिलानी आदींची उपस्थिती होती