दानशूरांनी पूरग्रस्त भागाला शक्य ती कोणत्याही स्वरूपात मदत पाठवावी- रामदास पाटील सुमठाणकर


नांदेड (प्रतिनिधी)
मुक्रामाबाद भागातील, मूकर्माबाद भिंगोली, भेंडेगाव,हसनाळ,रावणगांव, मारजवाडी,रावी, सावळी,या व अन्य गावात अतिवृष्टी ने खूप मोठं नुकसान झाले आहे दानशूरांनी सदर पूरग्रस्त भागाला शक्य ती कोणत्याही स्वरूपात मदत पाठवावी अशी विनंती रामदास पाटील सुमठाणकर यांनी केली आहे
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याने रामदास पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बऱ्याच गावाना भेटी देऊन पहाणी केली या वेळी स्थानिक स्तरावरील त्यांचे मित्र परिवारातील प्रदीप पाटील, बालाजी ढोसने,बालाजी पाटील, पप्पू रावणगांवकर, केरूरकर पाटील,दिनेश आवडके आणि त्यांची टीम, सद्दाम कोतवाल, ज्ञाणेश्वर सुरणार,विजय राठोड,निळकंट पाटील,राम साळवेश्वर,सदा घाले,नितीन टोकलवाड, तुकाराम सूडके,रमाकांत पाटील,दिनेश पाटील,श्रीकांत काळे,अनिल बल्लेवार,प्रसाद देवणे, जलील भाई, चंद्रशेकरं पाटील,बळवन्त पाटील, सुधाकर सुरणरं असे अनेक मित्र त्या त्या भागात गावात प्रत्यक्ष चिखलात उतरून गरजू ना दिवस रात्र मदत करत आहेत.
लोकांचे जीवनावश्यक साहित्य पूर्णतः वाहून गेलं.आज अनेक व्यक्ती,संस्था मदतीसाठी उतरल्य आहेत.याचा अभिमान वाटतो.संकटकाळी सर्व मदतीसाठी उतरले आहेत.
त्याच बरोबर माझ्या मित्र परिवाराकडून जिथं जिथं शक्य तिथं खिच्चडी बनवून जेवण देत आहेत.तरं प्रत्येक कुटुंबाला आधार म्हणून जीवनावश्यक अन्नधान्य किट उद्या पासून मित्रमंडळ कडून वाटप करण्यात येणार आहे.सर्व तरुण मित्र किट बनवत आहेत.रात्रीतून अत्यंवश्यक किट बनवून पूर्ण होतील तश्या त्यांना मदतीसाठी सूचना ही दिल्या आहेत.
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राबणाऱ्या सर्व जिवलग मित्राचे आभिमान आहे.राज्यातून सर्व दानशुरांनी पूरग्रस्त भागाला शक्य ती कोणत्याही स्वरूपात मदत पाठवावी अशी विनंती रामदास पाटील सुमठाणकर यांनी गौरव महाराष्ट्राचा शी बोलताना केली आहे