आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना साडीचोळी भेट ,जवळा बाजार पोलीस चौकीचा अभिनव उपक्रम

वसमत (प्रतिनिधि)
जवळा बाजार पोलीस चौकीच्या अधिका-यांच्या पुढाकारातून जवळा परिसरातील शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त साडीचोळी भेट म्हणून देण्यात आली.
हट्टा पोलीस ठाणेअंतर्गत जवळा बाजार पोलीस चौकी येथे कार्यक्रम घेण्यात आला.असोला येथील दोन शेतकरी व वडद येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या वतीने
साडीचोळी व फराळाचे साहित्य वाटप केले.
या मध्ये असोला येथील अंगद अशोकराव ढोबळे व मधुकर नामदेव सोन्ने (रा. असोला), सुंदर मारोतराव चौधरी (रा. वडद) यांचा समावेश आहे. कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे,उपनिरीक्षक सतीश तावडे, सुरेश भारशंकर, महेश गर्ने, वनराज पाईकराव, राजेश वळसे, सरपंच गजानन ढोबळे,माऊली ढोबळे, बबन ढोबळे, विठ्ठल नागरे, केशव ढोबळे, राहुल कीर्तने आदींची उपस्थिती होती.
News Category:
Basmat