वसमत शहरातील शहिद टिपु सुलतान चौकाचे सुशोभीकरण करा,सकल मुस्लिम समाजाची मुख्याधिका-याकडे मागणी

वसमत (प्रतिनिधी) नगर परिषदे मार्फत वसमत शहरातील शहिद टिपु सुलतान चौकाचे सुशोभीकरन्याची लेखी मागणी सकल मुस्लिम समाजाने  सोमवारी मुख्याधिका-याकडे केली आहे

निवेदनात नमूद करण्यात आले की वसमत शहरात नगर परिषद हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून शहीद टिपु सुलतान चौक आहे. प्रशासनाने दुर्लक्षित केल्यामुळे सदरील चौकाचे सुशोभीकरण होऊ शकले नाही त्यामुळे सदरील चौकाचा विकास झाला नाही आणि चौकाच्या अवतीभवती अस्वच्छतेमुळे सदरील चौकाची अवहेलना होत आहे. येत्या महिन्यात शहिद टिपु सुलतान यांची जयंती असुन दरवर्षी हि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शहिद टिपु सुलतान यांनी भारतावर आक्रमक केलेल्या इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा थोर स्वातंत्र्यसेनानीची जयंती पुढील महिन्यात साजरी होणार असुन नगर परिषद प्रशासनाने जयंतीच्या निमित्ताने जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील शहिद टिपु सुलतान चौकाचे सुशोभीकरण करून सदरील चौकाचा विकास करावा व एक सुंदर स्वच्छ चौक तयार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

निवेदनावर माजी नगराध्यक्ष अ.हफिज अ.रहेमान, मा.नगरसेवक शेख खैसर अहेमद,ऎडव्हकेट शेख मोहसीन,खालिद शाकेर,मैनोद्दीन संदलजी,शेख अय्युब पॉपुलर,इर्फान पठाण,नदीम सौदागर,शेख अलीमोद्दीन,अजगर पटेल,मौलाना मुबीन,वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश धोत्रे,शेख मजहर,नसिब पठाण,अब्दुल जाफर,शेख माजिद आदी सह समस्त मुस्लिम समाज बांधव वसमत च्या स्वाक्ष-या आहेत

News Category: 
Basmat

Sharing