काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांची भेट,भारत जोडो यात्रा संदर्भात झाली चर्चा

(फेरोज पठाण - संपादक)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या वेळी भारत जोडो यात्रा संदर्भात चर्चा झाली

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा हिंगोली जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या  भेटी घेऊन यात्रा यशस्वी करण्याबाबत चर्चा करीत आहेत 

बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या वेळी जयप्रकाशजी दांडेगावकर सह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख अय्यूब पॉपुलर यांनी नानाभाऊंचा स्वागत सत्कार केला या वेळी भारत जोडो यात्रा संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अब्दुल हफिज अब्दुल रहेमान,डॉक्टर एम. आर.क्यातमवर,महिला काँग्रेसच्या प्रीती जैस्वाल, तालुकाध्यक्ष राजाराम खराटे,यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या तसेच वसमत नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष म.रियाजोद्दीन कुरेशी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात हजेरी लावली

News Category: 
Maharashtra

Sharing