पानी फाऊंडेशनच्या ''रब्बी डिजिटल शेती शाळा' अभियान शेतकऱ्यांसाठीं लाभधारक ठरेल - डॉ.सच्चीन खल्लाळ

वसमत प्रतिनिधी
ज्ञान मिळवून, उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी पानी फाऊंडेशनचा 'रब्बी डिजिटल शेती शाळा' अभियान शेतकऱ्यांसाठीं लाभधारक ठरेल असा विश्वास वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ.सच्चीन खल्लाळ यांनी व्यक्त केला आहे
ही शाळा पानी फाउंडेशनने आयोजित केलेल्या कुठल्याही स्पर्धेचा भाग नाहीय.महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शाळा खुली आहे. ज्ञान मिळवून, उत्पादन आणि नफा वाढवणे हेच या शाळेचे उद्दिष्ट आहे. यात अट मात्र एकच आहे की गटाच्या रुपात एकत्र येऊन गटाची नोंदणी शेतकऱ्यांनी करायला हवी.
आपल्याकडील शेतकर्यांनी अशा प्रकारे विविध पिकासाठी गटाची नोंदणी करून अशा कार्यशाळा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर घेण्या बाबत पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचा विश्वास डॉ.खल्लाळ यांनी व्यक्त केला आहे
कार्यशाळेत
नोंदणीसाठी हा फॉर्म भरावा : https://cutt.ly/rabbi_gatsheti*