हिंगोली मध्ये पक्षी संशोधन केंद्र सुरु करत आहे मोरांचा ठेपा - पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे यांची माहिती

वसमत (प्रतिनिधी) हिंगोली मध्ये पक्षी संशोधन केंद्र "मोरांचा ठेपा" सुरु करत असल्याची माहिती पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे यांनी दिली आह

राजा म्हणजे अधिपती /भूपति, सर्वदूर भारतात अधिवास असलेला मोर हा सुद्धा पक्षी जगतातला राजा.डोळ्याचं पार्ण फेडणार सुंदरता, रंगाची विलोभनीय घडण, रेशमी चमक असलेला मोर, जेव्हा लांडोर साठी पिसारा फुलवून नाचतो तेव्हा पाहणाऱ्यास स्वर्ग अनुभूती होते.राष्ट्रीय पक्षी असलेला मोर हिमगोलीत मोठ्या प्रमाणात आहे.मोराबद्दल बोलताना पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे सांगतात हिंगोली सोडलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हात मोरांचे रखवाले तयार झाले आहेत. हिंगोली माधव पण या अघोरीं पाशवी प्रवृत्तीचे काही लोक आहेत.मोरांचे अस्तित्व धोक्यात, मोरांच्या हत्या होत आहेत, मोरांना दानापाण्याची सोय, मोरांची आई, मोरांचा मित्र, मोराचं संगोपन केंद्र इत्यादी मथाळ्या खाली मोरांचे पालक मालक उत्पन्न होत आहेत.या पुढे जाऊन पक्षी संशोधक यांचा उल्लेख मानवी बुद्धी वापरून सर्व काही आधीपात्या खाली आणण्याचे अघोरीं स्वप्न असा करतात.स्वतंत्र निसर्गाचा आनंद घेण्या पेक्षा हे माझ्या मुळे आहे असे दर्शवण्यात या लोकांना जास्त आनंद होतो. या सर्व प्रकारस पक्षी संशोधक यांच्या मते एकच उत्तर असेल ते म्हणजे "मोरांचा ठेपा*,ठेपा म्हणजे आधार, ठरलेलं ठिकाण, जिथे मोरांना नैसर्गिक जीवनात जगताना पाहता येईल, त्यांना कुणीही तिथे गुलाम, पाळीव बनवणार किंवा त्यांचे मालक बनणार नाही, त्यांच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभा करून दानापानी करणार नाही. "मोरांचा ठेपा" जे मोरंच अस्तित्व किती स्वातंत्र्य मुक्त पणे जगात आहे आणि जैविविधता कशा मानवी हस्ताक्षेपशिवाय समवृद्ध असतें हे दर्शवण्याचा प्रयत्न आधुनिक पक्षी संशोधक
सूर्यकांत खंदारे करीत आहेत

News Category: 
krushi jagat

Sharing