मा.खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसा निमीत्त वसमत येथे टेनिस बॉल  क्रिकेटचे खुले सामने

माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर,आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा

वसमत प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्त टेनिस बॉल क्रिकेटचे भव्य खुले सामने आयोजित करण्यात आले असून 3 डिसेंम्बर शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद मैदान,वसमत येथे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा भव्य शुभारंभ होणार आहे

 टेनिस बॉल क्रिकेट स्पोर्टस असोसिएशन हिंगोली आयोजित स्पर्धेचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय साखर संघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष मा.श्री.जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शुभहस्ते   संपन्न होत असून या वेळी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे, हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक मा.जी.श्रीधरन, तहसीलदार वसमत अरविंद बोळंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म.अय्युब पॉपुलर सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

इच्छुक क्रिकेट संघांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यासाठी नविद अहेमद,
8149799888,इरफानसिद्दीकी,
9421864525, म.साजीद 9096967767,जुनेद चाऊस 7035352727 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टेनिस बॉल क्रिकेट स्पोर्टस असोसिएशन हिंगोलीचें सचिव नम्मु उर्फ अमजद खान 9422557696 यांनी केले आहे

News Category: 
Krida Jagat

Sharing